गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (16:05 IST)

78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह, एक वर्षापासून क्वारंटाईन

तुर्कस्तानमध्ये एक व्यक्ती अशीही आहे ज्याचा कोरोना रिपोर्ट गेल्या 14 महिन्यांपासून सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे ती व्यक्ती सतत क्वारंटाईन आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ती व्यक्ती पहिल्यांदा कोरोनाला बळी पडली तेव्हापासून सतत आयसोलेशनमध्ये आहे.
 
मुजफ्फर कायसन असे या व्यक्तीचे नाव आहे आणि ते गेल्या एक वर्षापासून रुग्णालयात आहे. रोज ते आपल्या घरी परत येण्याची वाट पाहत असतात पण तसे होत नाही. नोव्हेंबर 2020 मध्ये पहिल्यांदाच कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी त्यांची लक्षणे बरी झाली पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला नाही.
 
तेव्हापासून त्यांची 78 वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु प्रत्येक वेळी अहवाल पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सतत रुग्णालयात किंवा घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

सततच्या अलिप्ततेमुळे कायसनचे सामाजिक जीवन संपुष्टात आले असून त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवता येत नाहीये तसेच मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारता येत नाहीये. खिडकीतून ते त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधतात. विलगीकरणात असताना त्यांच्यासाठी सर्वात मोठे दुःख त्यांच्या प्रियजनांना ते स्पर्श देखील करू शकत नाही. निगेटिव्ह न आल्याने त्यांना कोरोनाची लसही घेता आली नाही.
 
56 वर्षीय कायसनला ल्युकेमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे, ज्यात आजारांमुळे पांढऱ्या रक्त पेशी कमी होतात आणि रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होते. यामुळे कायसनच्या रक्तातून कोरोना विषाणू नष्ट होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना औषधे दिली जात असली तरी ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय संथ आहे. कायसनचे प्रकरण हे अशा प्रकारचे पहिले आहे, ज्यामध्ये रुग्ण इतके दिवस कोरोना पॉझिटिव्ह आहे.