#webviral68 च्या वयात दहावींचे विद्यार्थी, पास होण्याचा जुनून
नेपाळ येथील दुर्गा कामी आजोबा आहेत आणि 68 वर्षाच्या वयात सर्वात वृद्ध विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. मध्येच सुटलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळेत प्रवेश मिळवला.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
गरिबीमुळे दुर्गा कामी यांना लहानपणी अभ्यास सोडावा लागला होता. पण आता ते शिक्षक बनण्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. काठीच्या मदतीने चालणारे कामी यांना शाळेपर्यंत पोहचायला काही तासाचा प्रवास करावा लागतो. त्यांच्या वर्गात शिकणार्या मुलांचे वय 14 आणि 15 वर्ष आहे.
त्याचे सहाध्यायी त्यांना बा म्हणून हाक मारतात. नेपाळी भाषेत बा अर्थात वडील. कामी यांच्या पत्नीचा देहांत झाल्यानंतर ते एकटे पडले. हेही एक कारण आहे ज्यामुळे त्यांनी पुन्हा शाळेत प्रवेश मिळवला. आणि त्यांना शाळेत जायला फार आवडतं.
आपल्या वयाची काळजी न करता ते शाळेतील प्रत्येक अॅक्टिव्हीटीमध्ये भाग घेतात. त्यात वॉलीबॉलदेखील सामील आहे. ते मरेपर्यंत अभ्यास करू इच्छित आहे. त्यांना आशा आहे की त्यांचे उदाहरण समोर ठेवून लोकं वय हे कोणतेही काम करण्यासाठी अडथळा नाही हे समजून घेतील.