Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2020 : कोव्हिड-19 संकटादरम्यान खेळाडूंसमोर मोठी अडचण कोणती?

Updated: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (11:58 IST)
 
या अडचणींचा उल्लेख रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओत केला आहे.
 
डिव्हिलियर्स म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर या प्रकारच्या परिस्थितीत खेळण्याचा मला अनुभव नाही. इथं प्रचंड ऊन आहे. या वातावरणामुळे मला जुलै महिन्यात खेळलेल्या एका कसोटी सामन्याची आठवण येत आहे. त्या सामन्यात विरेंद्र सेहवागने आमच्याविरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. आयुष्यात त्यापेक्षा जास्त उष्णतेचा अनुभव आम्हाला कधीच आला नव्हता."
 
संयुक्त अरब अमिरातीमध्ये बऱ्याच काळापासून एका स्पोर्ट्स चॅनलमध्ये काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार नीरज झा तिथल्या अडचणींबाबत सांगतात, "इथं तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असतं. सोबतच स्टेडियमबाहेरील वाळूच्या मैदानांमुळे जास्त अडचण होते.
 
वाळूतील उष्णतेमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णताही प्रचंड वाढते. या परिस्थितीशी जुळवून घेणं, खेळाडूंसाठी(IPL 2020) मोठं आव्हान असणार आहे.उष्णतेसोबतच समुद्रकिनाऱ्यावर ही शहरं असल्यामुळे याठिकाणी आर्द्रतेची पातळीही जास्त असते. तिन्ही शहरांमध्ये आर्द्रतेची पातळी 70 टक्के असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या परिस्थितीत खेळाडूंना डिहाड्रेशन होण्याचा धोका आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

बीसीसीआय, निवड समिती आणि सेंटर ऑफ एक्सलन्सने भारतीय संघाच्या तंदुरुस्तीबाबत भूमिका अधिक कडक केली

अफगाणिस्तानविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; संजू सॅमसनचे पुनरागमन

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय टी२० संघ जाहीर, वैभवला संधी

रोहित शर्मासोबत 'फॅमिली फुल हाऊस' १९ सप्टेंबरपासून सुरू, टीझर प्रदर्शित

रणजी ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कर्णधारपदी बदल, शार्दुल ठाकूरच्या जागी सिद्धेश लाडची निवड

पुढील लेख
Show comments