रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा

rohit sharma
मुंबई| Last Modified गुरूवार, 15 एप्रिल 2021 (13:14 IST)
Twitter
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत असलेल्या संदेशामुळे चर्चेमध्ये आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याने लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या
प्रजाती वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही त्याने खास संदेश दिला आहे.

चेन्नईच्या चिदम्बरम मैदानात कोलकाता विरुद्धचा सामना मुंबईने 10 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित ने या सामन्यात 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या बुटावरील संदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याच्या बुटावर निळ्या रंगाच्या पाण्यात पोहत असलेल्या कासवाचे चित्र होते. यातून प्लास्टिमुक्त समुद्र हा संदेश त्याने दिला.
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात ही त्याने खास संदेश दिला होता. एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो होता. तसेच गेंड्यांना वाचवा, असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. रोहितने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनराइजर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना 17 एप्रिलला खेळला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात काय संदेश देतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ...

India tour of sri lanka :भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे ...

IND vs SL: श्रीलंका दौर्यावर जाणारी टीम इंडिया मुंबईत 14 ...

IND vs SL: श्रीलंका दौर्यावर जाणारी टीम इंडिया मुंबईत 14 दिवस क्वारंटीन होईल
एन. शिखर धवन यांच्या नेतृत्वात टीम इंडिया या महिन्याच्या शेवटी तीन एकदिवसीय मालिका आणि T ...

हरभजन सिंग WTC फायनलपूर्वी शुभमन गिलच्या समर्थनात

हरभजन सिंग  WTC फायनलपूर्वी शुभमन गिलच्या समर्थनात
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच, ...

चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल : पार्थिव पटेल

चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल : पार्थिव पटेल
न्यूझीलंडविरुध्दच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजारा हा ...

उर्वरित आयपीएल 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान

उर्वरित आयपीएल 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील रणसंग्रामाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचा ...