रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (20:10 IST)

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

SRH vs KKR
आयपीएल 2024 सीझनचा ग्रुप स्टेज संपला असून आता चार संघ प्लेऑफमध्ये आपला ठसा उमटवतील. पहिल्या क्वालिफायरमध्ये दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना या हंगामात तुफानी फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

 गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये राहिल्यामुळे दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतील.हैदराबादने या मोसमात दोनदा आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली.

नरेन केकेआरला दमदार सुरुवात करत आहे. नरेन या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने 461 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर नरेनची चेंडूसह कामगिरीही दमदार राहिली आहे.

अभिषेक-हेड जोडी सनरायझर्स हैदराबादसाठी धोकादायक आहे.अभिषेक आणि हेड या दोघांनी या मोसमात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. हेडने आतापर्यंत 533 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, अभिषेकही जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने या मोसमात 467 धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर IPL च्या चालू मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणजे अभिषेक. अभिषेकने एकूण 41 षटकार मारले आहेत. 

Edited by - Priya Dixit