deepawali
✕

Google Searchमधून जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठीच्या 8 सोप्या ट्रिक्स

Updated: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (12:05 IST)
 
म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयक बातम्या वाचायच्या असतील पण कोरोना व्हायरसविषयीच्या बातम्या वाचायच्या नसतील तर काय करायचं?
 
सोपं आहे. सर्च करताना Health -coronavirus असं टाईप केलं तर कोरोना व्हायरस वगळून आरोग्यविषयक इतर माहिती येईल.
 
पण हे करताना त्या शब्दाला चिकटून आधी डॅश किंवा हायफनचं चिन्हं वापरावं. डॅश आणि शब्द यात स्पेस नको.
3. कालावधी दाखवण्यासाठी टिंबाचा (..) वापर
एखाद्या ठराविक कालावधीमधली माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.
 
म्हणजे तुम्हाला 2008 ते 2012 या काळात रीलिज झालेल्या जेम्स बाँड सिनेमांची यादी हवी असेल, तर तसं संपूर्ण वाक्य लिहिण्याऐवजी James Bond 2008..2012 असं सर्च करा.
 
किंमतीबाबतही तुम्ही हे करू शकता. म्हणजे 20 ते 30 हजार रुपये किंमत असणारा लॅपटॉप तुम्हाला शोधायचा असेल तर Rs.20,000..30,000 Laptop असं सर्च करा.
 
4. फक्त तुम्हाला हव्या त्या वेबसाईट्सवरची माहिती सर्च करा
एखाद्या सर्च टर्मच्या (सर्च करतोय त्या शब्दाच्या) आधी वा नंतर एखादी विशिष्ट वेबसाईट लिहील्यास गुगल तुम्हाला त्या वेबसाईटवरच्या माहितीचे सर्च रिझल्ट दाखवेल.
5. एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती
गुगलवर तुम्हाला एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती मिळवण्यासाठीही सर्च करता येईल.
 
असं करण्यासाठी Location हा शब्द वापरा.
 
पाऊस लोकेशन : मराठवाडा bbc.com/marathi असं सर्च केल्यास तुम्हाला बीबीसी मराठीवरच्या मराठवाड्यातल्या पावसाविषयीच्या बातम्या मिळतील.
 
एखाद्या विशिष्ट वेबसाईटवर सर्च करायचं नसल्यास तुम्ही फक्त सर्च करायची गोष्ट आणि त्यापुढे लोकेशन लिहून माहिती शोधू शकता.
 
6. दोन गोष्टी एकावेळी शोधण्यासाठी | चा वापर
एकमेकांशी संबंध नसलेल्या दोन गोष्टी तुम्ही एकाचवेळी शोधू शकता.
 
या दोन शब्दांच्या मध्ये | घातल्यास त्याचा वापर or सारखा होतो आणि आणि गुगल तुम्हाला या दोन शब्दांविषयीचे रिझल्ट्स दाखवले.
7. एखाद्या कंपनीची शेअर बाजारातली माहिती.
जर तुम्हाला शेअर बाजारात रस असेल किंवा मग तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेतले आहेत, त्याच्या किंमतींवर लक्ष ठेवायचं असेल तर मग गुगलला साधी सूचना देऊन तुम्ही ही माहिती मिळवू शकता.
 
stock : असं लिहून तुम्ही तुम्हाला हव्या त्या कंपनीचं नाव समोर लिहा.
 
त्या कंपनीची कामगिरी तुम्हाला गुगल दाखवेल.
 
8. फाईलच्या फॉरमॅटनुसार सर्च करा.
एखाद्या विशिष्ट वेबसाईटवरची माहिती सर्च न करता जर ती तुम्हाला एखाद्या विशिष्ट फॉरमॅटमध्ये शोधायची असेल, तर तुम्ही तसं करू शकता.
 
असं करण्यासाठी सर्च टर्मच्या पुढे filetype : असं लिहून शोधा.
 
वर्ड फाईलसाठी doc किंवा पीडीएफसाठी pdf असं तुम्ही लिहू शकता.
 
उदा. नवरात्र नियमावली filetype : jpeg

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments