शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (15:00 IST)

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही दिवसातच या बाजारपेठेचा मोठा भाग बनला आहे. सामन्य लोकांना परवडेल असे अनेक प्लान जीयोने दिले. त्यामुळे अनेक टेलेफोन कंपन्या अडचणीत आल्या. जेथे जवळपास ३०० रु मध्ये फक्त एक जीबी महिना मिळत होते तेथे जीयोने कमी किंमतीत मोफत संवाद आणि रोज १.५ जीबी डेटा दिला त्यामुळे इतर कंपन्या करत असलेली लुट थांबली आहे.
 
त्यामुळे पुन्हा एकदा  भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. आता नव्या प्लानच्या माध्यमातून एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओला टक्कर देणार आहे. एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लान 558 रुपयांचा आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रति दिन 3GB इंटरनेट डेटा मिळणार असून याची वैधता 82 दिवसांची असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 558 रुपयांत एकूण 246 GB डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या या नव्या पॅकमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग अंतर्भूत असून प्रति दिवस  100 SMS मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 509 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना प्रति दिन 4GB 4G डेटा मिळतो. मात्र, याची वैधता केवळ 28 दिवसांचीच आहे. वोडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी अशाच प्रकारचा प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत 569 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन 3GB डेटा मिळतो आणि त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग तसेच प्रति दिन केवळ 250 फ्री मिनिट्स मिळतात. जर जीयोने या प्लानची दखल घेतली आणि वैधता वाढवत किंमत कमी केली तर पुन्हा इतर टेलिफोन कंपन्या अडचणीत येतील.