सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

यू-ट्यूबवर आता डार्क मोड

यू-ट्यूबवर आता डार्क मोडो वापरण्याची सुविधा मिळणार असून अँड्रॉइडच्या यूजर्सला हे फीचर क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येत आहे. यू-ट्यूब या संकेतस्थळाच्या वेब आवृत्तीला गतवर्षी डार्क मोड वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यानंतर या वर्षाच्या प्रारंभी आयओएस प्रणालीच्या यूजर्सला हे फीचर देण्यात आले होते. आता याला अँड्रॉइड यूजर्ससाठी देण्यात येत आहे. सध्या सर्व यूजर्सला याचे अपडेट मिळालेले नसले तरी क्रमाक्रमाने याला लागू करण्यात येणार आहे. डार्क मोडमध्ये नावातच नमूद असल्यानुसार पार्श्वभाग हा गडद काळ्या रंगात परिवर्तीत करण्याची सुविधा मिळते. सध्या यू-ट्यूबचा पार्श्वभाग हा पूर्णपणे पांढर्‍या रंगातला आहे. याला कुणीही यूजर हव्या त्या वेळेला काळ्या पार्श्वभागात परिवर्तीत करू शकतो. डार्क मोड हा यूजर्सला खूप उपयुक्त ठरणारा आहे. यामुळे यूजरच्या डोळ्यांवरील ताण हा बर्‍याच प्रमाणात कमी होत असतो. सध्या यू-ट्यूबवर बराच काळ व्यतीत करणार्‍या यूजर्सची संख्या जास्त आहे. यामुळे कोणत्याही व्हिडिओमधील गडद रंग हा उठावदार पद्धतीनं अनुभवता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीची बचतदेखील होणार आहे. कोणताही अँड्रॉइड यूजर आपल्या यूट्यूब अ‍ॅपला अपडेट करून याचा वापर करू शकतो. यासाठी त्याला सेटिंगमध्ये जाऊन जनरल हा पर्याय निवडावा लागणार आहे. येथे त्याला डार्क थीम हा पर्याय दिसणार आहे. याला सिलेक्ट करताच डार्क मोड कार्यान्वित होणार आहे. यू-ट्यूबने आपल्या यूजर्सला नवनवीन फीचर्स देण्यासाठी कंबर कसल्याचे अलीकडच्या काळात दिसून आले आहे.