गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:34 IST)

माहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न

फेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात. कुठली वेबसाईट आपली माहिती वापरु शकते, हे आता युजर्सच्या हातात असेल. युजर्सच्या परवानगीशिवाय वैयक्तिक माहितीचा वापर इतर कुणालाही फेसबुकच्या माध्यमातून वापरता येणार नाही. त्यासाठीच फेसबुकने काही महत्त्वाचे बदल अॅपमध्ये केले आहेत.

कोणत्या वेबसाईटला माहितीचा अॅक्सेस द्यायचा, हे असे ठरवता येईल 

- फेसबुक अकाऊंट लॉग इन करा.
- सेटिंगमध्ये जा.
- डाव्या बाजूस असलेल्या 'Apps and Websites' या पर्यायवार क्लिक करा.
- तिथे अॅक्टिव्ह, एक्स्पायर्ड आणि रिमूव्ह्ड असे तीन पर्याय दिसतील.
- अॅक्टिव्ह पर्यायाखाली असलेल्या वेबसाईट्सना तुम्ही माहिती शेअर करत आहात. त्यातील नको असलेल्या वेबसाईट सिलेक्ट करुन रिमूव्ह करता येतात.
- पुढे एक्स्पायर्ड पर्याय आहे. त्यात अर्थात एक्स्पायर्ड वेबसाईट्स असतात. त्याही रिमूव्ह करता येतात.
- पुढे रिमूव्ह्ड पर्याय आहे. तिथे तुम्ही परवानगी नाकारलेल्या सर्व वेबसाईट्स दिसतात.