गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील असते नजर

कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी संसदेच्या उच्च सदन यूएस सीनेटकडे आपले उत्तर दिले. त्यात मान्य केले गेले की ते यूजरची खासगी माहिती, आवड-निवड माहीत करण्यासाठी कॉम्प्युटरच्या कीबोर्ड आणि माउसच्या मूव्हमेंटवर नजर ठेवली जाते. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर फेसबुक लॉगइन असल्यास माउसच्या प्रत्येक क्लिक आणि की-बोर्ड च्या प्रत्येक वापरण्यावर फेसबुकवर नजर असते. यामुळे फेसबुकला कळतं की यूजर कोणत्या सामुग्रीवर किती वेळ घालवत आहे. याप्रमाणे त्याला जाहिराती दाखवल्या जातात. असे दोन हजार प्रश्न होते ज्यांचे उत्तर 454 पानात दिले गेले.
 
यावर असते फेसबुकची नजर
 
डिव्हाईस इन्फॉर्मेशन: आपण ज्या कॉम्प्युटर, मोबाईल किंवा डिव्हाईसने फेसबुक लॉगइन करतात त्याची माहिती फेसबुकला असते. जसे डिव्हाईसमध्ये किती स्टोरेज आहे, कोण-कोणते फोटो आहे आणि किती नंबर जतन केलेले आहेत.
 
अॅप इन्फॉर्मेशन: आपल्या डिव्हाईसमध्ये कोण-कोणते अॅप्स आहे हे देखील फेसबुकला माहीत असतं. कोणत्या अॅपला किती वेळ देण्यात येत आहे आणि याद्वारे प्राप्त माहिती डेटाबेसमध्ये यूजर प्रोफाईलसह जतन केली जाते. 
 
डिव्हाईस कनेक्शन: यूजर कोणतं नेटवर्क वापरत आहे किंवा कोणत्या वाय-फायने कनेक्ट आहे हे देखील माहीत असतं. फेसबुक डिव्हाईस जीपीएसवर देखील नजर ठेवतो ज्याने त्याला यूजरची लोकेशन माहीत पडत असते.
 
बॅटरी लेवल: डिव्हाईसच्या बॅटरी लेवलकडेही फेसबुकच लक्ष असतं. फेसबुक अॅप डिव्हाईसची अधिक बॅटरी वापरत तर नाहीये हे जाणून घेणे उद्देश्य असतं. त्याप्रमाणे अॅप अपडेट केलं जातं. 
 
कॅमेरा इन्फॉर्मेशन: अनेकदा नाकारलं असलं तरी फेसबुकने कॅमेरा आणि मायक्रोफोनवर नजर ठेवण्याची गोष्ट स्वीकारली आहे. त्या हिशोबाने यूजरला फेसबुक अॅप फिल्टर आणि इतर फीचर वापरण्याचा सल्ला दिला जातो.