बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (17:27 IST)

गुगलने पहिल्यांदा तयार केले एआय डुडल

गुगलने पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आधारित गुगल डुडल तयार केलं आहे. या डुडलवर कुणीही आपली ट्यून बनवू शकतो आणि विशेष मशीन लर्निंग मॉडेलच्या मदतीने ही ट्यून बाहच्या शैलीत ऐकू येते. हे डुडल जर्मनीच्या प्रसिद्ध संगीतकार योहान सेबॅस्टियन बाह यांच्या स्मृतीत तयार केले गेले आहे. तसेच, गुगलने या डुडलशी कनेक्ट केलेले मशीन लर्निंग मॉडेल कोकोनेट देखील सादर केला. 
 
हे एआय आधारित डुडल Google Magenta आणि Google Payer टीम्सने एकत्र तयार केले आहे. हे फक्त इंटरनेट वापरकर्ते वापरू शकत होते आणि आपली विशेष ट्यूनही बनवू शकत होते. मोबाइलवर खाली डावीकडील प्ले बटणावर क्लिक केल्यानंतर हे डुडल प्रथम योहान सेबॅस्टियन बाह यांच्याबद्दल परिचय वापरकर्त्यास देतो आणि त्यानंतर त्याला स्वत: ची ट्यून बनविण्याचा पर्याय देतो. मशीन लर्निंग वापरकर्त्याकडून मिळणाऱ्या निर्देशांच्या मदतीने बाहच्या सिग्नेचर म्युझिक स्टाइलमध्ये ट्यून ऐकवतो.
 
कोण होते बाह?
जर्मनीच्या ईशनाच शहरात बाह यांचा जन्म झाला आणि त्यांच्या कुटुंबाचा संगीतासह जुनं नातं होतं. त्यांचे वडील अनेक वाद्य वाजवत होते आणि शहरातील संगीतकारांचे निदेशक म्हणून काम करायचे. त्याच वेळी, बाह यांचे मोठे भाऊ देखील एक संगीतकार होते.