गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:11 IST)

अद्याप विंडोज 7 ला Windows 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकता, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

मायक्रोसॉफ्टने 14 जानेवारीपासून विंडोज 7 ला सपोर्ट करणे बंद केले आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे मायक्रोसॉफ्टने हे सॉफ्टवेअर 2009 मध्ये लाँच केले होते. मायक्रोसॉफ्टने जेव्हा विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केले तेव्हा कंपनीने त्या वेळी सांगितले की विंडोज 7 चे वापरकर्ते विंडोज 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकतात, परंतु हे फीचर केवळ 29 जुलै, 2016 पर्यंत उपलब्ध होते.
 
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला विंडोज 7 ला विंडोज 10 होममध्ये अपग्रेड करायचे असेल तर तुम्हाला किमान 9,299 रुपये द्यावे लागतील, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण अजूनही विंडोज 7 ला विंडोज 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकता. चला तुम्हाला याची पद्धत दाखवू ....
 
इंग्रजी वेबसाइट zdnetच्या अहवालानुसार भले विनामूल्य Windows 10 मध्ये अपग्रेड करणारे प्रमोशन 2016 पर्यंत होते पण तुम्ही अजूनही विंडोज 7 ला विंडोज 10 मध्ये अप्रगेड करू शकता आणि खास गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्याही तृतीय पक्षाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपण मायक्रोसॉफ्टच्या साईटवरूनच हे डाउनलोड करू शकता.
 
वास्तविकता अशी आहे की विंडोज 7 वरून विंडोज 10 वर अपग्रेड करणारी लिंक मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर अद्याप लाइव्ह आहे, जिथून आपण आपले विंडोज 7 विंडोज 10 वर अपग्रेड करू शकता.
 
प्रथम या लिंकवर क्लिक करा आणि विंडोज 10 डाऊनलोडासाठी मायक्रोसॉफ्टच्या साईटवर जा. यानंतर, आपल्याला Creat Windows 10 installation media चा पर्याय दिसेल. या खाली, Download tool now वर क्लिक करा आणि चालवा.
  
यानंतर आपण आता अपग्रेड PC now वर क्लिक करा. यानंतर सापडलेल्या कमांडचे अनुसरणं करा. आता अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर, सेटिंग्ज आणि सुरक्षा वर जाऊन एक्टिवेशनमध्ये जा. यानंतर आपल्याला लाइसेंस कोड विचारला जाईल ज्यामध्ये आपल्याला विंडोज 7 चा लाइसेंस कोड प्रविष्ट करावा लागेल. तर या पद्धतीने आपण विंडोज 7 ला विंडोज 10मध्ये अपग्रेड करू शकता.