अनेक फीचर्स असलेला Redmi 8 लाँच
Xiaomi कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन Redmi 8 लाँच केला आहे. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. ऑरा मिरर, रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीकडून या फोनला कॅमेरा चँपियन असं नाव देण्यात आलं आहे.