गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (12:37 IST)

पासवर्ड सुरक्षित ठेवण्यास Google करेल तुमची मदत

तुमच्या पासवर्डला सुरक्षित ठेवण्यात आता गूगल तुमची मदत करेल. कंपनीने आधी पासवर्ड चेक करण्यासाठी एक्स्टेन्शन जारी केले होते, पण कंपनीने आता याला इनबिल्ट फीचर बनवण्याचा निर्णय घेतला आहे ज्याने रियल टाइम पासवर्ड प्रोटेक्शन मिळू शकेल.   
 
या वर्षी फेब्रुवारीमध्ये गूगलने आपल्या वेब ब्राउझर क्रोमसाठी पासवर्ड चेकअप एक्स्टेन्शन लाँच केले होते. कंपनीनुसार, हे एक्स्टेन्शन 10 लाखवेळा   डाउनलोड करण्यात आले होते, पण आता लवकरच गूगल क्रोममध्ये बिल्ट इन पासवर्ड चेकअप देण्यात येईल. यानंतर युजर्सला कुठल्याही एक्स्टेन्शनची गरज राहणार नाही. गूगल पासवर्ड मॅनेजर एंड्रॉयड आणि क्रोममध्ये सिंक होतो.   
 
कंपनी आता एक नवीन पासवर्ड चेकअप फीचर आणत आहे, जो हा शोध लावेल की तुमचा लॉग इन एखाद्या मोठ्या सिक्योरिटी ब्रीचचा भाग तर नाही आहे. जर कुठल्याही मोठ्या हॅ़किंगमध्ये तुमचा अकाउंट पासवर्ड ब्रीच झाला आहे, तर गूगल तुम्हाला पासवर्ड बदलण्याचा सल्ला देईल. जर तुम्ही कमजोर पासवर्डचा वापर करत आहात, तर यासाठी गूगल तुम्हाला सचेत करेल. यासाठी क्रोममध्ये बिल्ट इन फीचर देण्यात येईल.