बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मे 2018 (16:32 IST)

पेटीएमचे नवे फिचर, मोठ्या रकमेचा व्यवहार शक्य

डिजीटल वॉलेट कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी My Payments नावाचं एक नवं फिचर आणलं आहे. कंपनीने हे फिचर पेटीएमद्वारे मोठ्या रकमेचा व्यवहार करणाऱ्यांसाठी (Heavy Transaction) आणलं आहे.

या फिचरद्वारे आता वॉलेटमध्ये पैसे न टाकताही एका बॅंक खात्यातून दुसऱ्या बॅंक खात्यात पैसे पाठवता येणार आहेत. तसंच बॅंकेत पैसे ट्रान्सफर केल्यानंतर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. नेट बॅंकिंगप्रमाणे हे फिचर काम करेल. ब्लॉगद्वारे पेटीएमने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीचं हे फिचर अॅन्ड्रॉइड ग्राहकांसाठी आहे.

यापूर्वी पेटीएमद्वारे बॅंकेत पैसे टाकण्यासाठी ग्राहकांना आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागत होते. त्यानंतर बॅंकेत पैसे टाकण्यासाठी बॅंकेचा तपशील द्यावा लागायचा, आणि जर ग्राहकांच्या पेटीएम वॉलेटमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण झाली असेल तरच ते पैसे बॅंक खात्यात ट्रान्सफर करता यायचे. याशिवाय आधी पेटीएमद्वारे बॅंकेत पैसे टाकल्यास 3 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावं लागत होतं.