बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (13:29 IST)

जुन्या जीमेल खात्याचे ईमेल आपोआप नवीन खात्यावर कसे फॉरवर्ड कराल

जगातील सर्वोत्तम मेल सेवेत समाविष्ट जीमेलमध्ये अशे अनेक वैशिष्ट्ये आहे जे आपण कधी ही वापरले नसतील. येणार्‍या मेल ला दुसर्‍या   खात्यावर पाठवणे अशी एक वैशिष्ट्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जीमेल खात्यात येणार्‍या मेलला आपोआप दुसऱ्या खात्यात फॉरवर्ड करायचे असेल तर ही माहिती जाणून घ्या.
 
काय आहे त्या ट्रिक्स?
 
जर आपण नवीन जीमेल खाता बनवले आहे आणि तुम्हाला तुमच्या जुन्या मेलवर येणार्‍या सर्व मेल नवीन मेलवर पाहिजे असतील तर त्यासाठी प्रथम जीमेल खात्यात लॉग इन करा. यानंतर वर उजव्या बाजूला असलेल्या सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा. यानंतर, फॉरवर्डिंग आणि  POP/IMAP वर जा. फॉरवर्डिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर, kऐड ए फॉरवर्डिंग एड्रेस वर जाऊन ती मेल आयडी टाइप करा ज्यावर आपण मेल फॉरवर्ड करू इच्छित आहात. 
 
पुढील चरणामध्ये नेक्स्ट आणि प्रोसीडवर टॅप करा. आपण असे केल्यास, आपल्या मेल आयडीवर एक सत्यापन ईमेल पाठविला जाईल. आपल्याला त्या सत्यापन मेलवर क्लिक करावे लागेल. आता जीमेल अकाउंट सेटिंग्स पेज वर परत या आणि पेज रिफ्रेश करा. शेवटी ' Forward a copy of incoming mail to वर क्लिक करा आणि सेव्ह चेंजेसला सिलेक्ट करा. अशा प्रकारे आपल्या जीमेल खात्यावरील मेल दुसर्या खात्यावर फॉरवर्ड केले जातील. आपण हे वैशिष्ट्य बंद करू इच्छित असल्यास, स्टेप 2 नंतर फॉरवर्डिंग सेक्शनवर जाऊन डिसेबल ऑप्शनवर क्लिक करून   सेव्ह चेजेंस करा. या प्रकारे ही सेवा बंद होईल. आपण केवळ विशिष्ट प्रकारचे मेल फॉरवर्ड करू इच्छित असल्यास, तर आपल्याला एक फिल्टर तयार करावा लागेल. हे वैशिष्ट्य केवळ डेस्कटॉपवर चालू किंवा बंद केले जाऊ शकते. जीमेलच्या स्पॅम फोल्डरमध्ये येणारा मेल फॉरवर्ड केला जाऊ शकत नाही.
 
जीमेल डिलीट करू शकता
 
खाते हटविण्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शनसह लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरची आवश्यकता असेल. आपण जीमेल अॅपवर खाते हटवू शकत नाही. मोबाइल ब्राउझरद्वारे देखील तो हटविणे खूप कठीण आहे. वेब ब्राउझरमध्ये सर्व प्रथम गूगल अकाउंट पृष्ठ https://myaccount.google.com वर जा. त्यानंतर वरील उजव्या कोपऱ्यातील साइन इन बटणावर क्लिक करा आणि जो जीमेल अकाउंट तुम्हाला डिलीट करायचे आहे त्याची तपशील भरा. एकदा लॉग इन केल्यानंतर Account Preferences पाहा, हे वेबपेजच्या मध्यभागी टॉपिक बॉक्समध्ये असेल. त्यानंतर Delete your account or services वर क्लिक करा. पुढील पृष्ठावर, 'Delete Products' वर क्लिक करा. येथे आपल्याला पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. खाते हटविण्यापूर्वी, आपल्या डेटाची बॅकअप प्रत डाउनलोड करणे योग्य असेल. जीमेल संदेशाची संपूर्ण प्रत डाउनलोड करण्यासाठी,  Download Datal डाउनलोड करा. आपल्याला बॅकअप प्रत मिळाल्यानंतर पुढील स्टेपमध्ये जीमेलमधील ट्रैश चिन्हावर क्लिक करा.