मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (13:14 IST)

ऍपलच्या iPhone Xचे काही मॉडेलमध्ये अडथळे येत असल्याने मोफत दुरुस्तीचे ऑफर

ऍपल इंकने अलीकडेच त्यांच्या दोन उत्पादनांमध्ये, iPhone X आणि 13-इंच मॅकबुक प्रोमधील अडथळे मान्य केले आहे. कंपनी म्हणते की काही आयफोन एक्स स्क्रीनच्या स्पर्शास प्रतिक्रिया देत नाही आणि काहीचे स्क्रीन स्पर्श न करता प्रतिक्रिया देत आहे. आयफोन एक्स 2017 मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आला आणि सप्टेंबरमध्ये आयफोन XS आणि XR मॉडेल सुरू झाल्याने त्याची विक्री बंद झाली. आयफोन एक्सच्या स्क्रीनबद्दल येणार्‍या त्रासाबद्दल ऍपलला बर्‍याच ऑनलाईन तक्रारी मिळाल्या. ऍपलने असेही सांगितले की मॅकबुक प्रो मधील वापरकर्त्यांना डेटा लॉसची समस्या येत आहे.
 
ऍपलने हे मॅकबुक प्रो जून 2017 ते जून 2018 दरम्यान बाजारात आणले होते. यात 256 जीबी स्टोरेज आहे. मॅकबुक प्रोमध्ये अडचण असल्यामुळे ऍपलने म्हटले आहे की कंपनी शक्य तितक्या लवकर त्यांच्या लॅपटॉपमध्ये येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आयफोन एक्सच्या बाबतीत ऍपलने ग्राहकांना मोफत स्क्रीन बदलण्याची ऑफर दिली आहे. दुसरीकडे, मॅकबुक प्रोसाठी विनामूल्य दुरुस्ती करण्याचा ऑफर देण्यात आला आहे.