iphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय
सोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मॅनेजमेंट टीमला केवळ अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन वापरण्यास सांगितले आहे.
उल्लेखनीय आहे की अॅपल संस्थापक टिम कूकने फेसबुकची निंदा केली होती. MSNBC ला दिलेल्या मुलाखतीत टिम कुकला कॅंब्रिज अॅनालिटिका प्रकरणाबद्दल विचारल्यावर 'फेसबुक युजर्सच्या डेटातून पैसे कमावतो, अॅपल असं कधी करणार नाही', असे त्यांनी स्पष्ट केले होते. गोपनियतेविषयी अॅपल नेहमीच कठोर राहिलंय कारण हा मानवी अधिकार असून आम्ही यूझर्सच्या वैयक्तिक आयुष्यात ढवलाढवल करत नाही असे म्हटत या प्रकरणामुळे सार्वजनिकपणे फेसबुकची निंदा झाल्याने दोन्ही कंपन्यांमध्ये ताणावाचे वातावरण आहे.
यावर कुकचे हे वक्तव्य वायफळ असल्याचे झुकरबर्गने म्हटले होते. तसेच झुकरबर्ग यांच्याप्रमाणे कुकेचे आरोप अगदी खालच्या दर्जाचे होते. परंतू मॅनेजमेंटला केवळ अॅण्ड्रॉईड वापरायला सांगण्यामागे हेच कारण आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.