शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

आयफोन चे 3 मॉडेल्स लॉन्च, iPhone आणि iPhone 8 च्या किमतीत कपात

जगात प्रसिद्ध असलेली कंपनी आय फोन ने त्यांच्या नवीन तीन मोबाईल बाजारात आणले आहेत. त्यामुळे त्यांचे जुने आय फोन ७ आणि ८ दरातही कपात करण्यात आली आहे.

अॅपलने iPhone च्या या मॉडेलची किंमत १०० डॉलरने घटवली आहे, म्हणजेच जवळ-जवळ ७ हजार २०० रूपयांनी ही किंमत कमी झाली आहे. त्यामुळे जुने आय फोन स्वस्त झाले आहेत. आता  iPhone 7 ची किंमत 549 डॉलरच्या बदल्यात 449 डॉलर म्हणजेच ३२ हजार ३२८ रूपये असणार असून,  iPhone 7 Plus आता 569 डॉलर म्हणजेच ४० हजार ९६८ रूपयांना मिळणार आहे. याच प्रमाणे iPhone 8 ची किंमत कमी झाली असून, तो फोन 599 डॉलर म्हणजे ४३ हजार १२८ रूपयांना मिळणार आहे.

iPhone 8 Plus ची किंमत 699 डॉलर म्हणजेच 50 हजार 328 रूपये असणार आहे. वरील किंमती या अमेरिकेत कमी झालेल्या आहेत, भारतातबद्दल लवकरच यासारखा बदल होण्याची शक्यता आहे.