शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:09 IST)

रिलायन्स लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन आणणार

रिलायन्स जिओपाठोपाठ रिलायन्स कंपनी लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करत आहे. विशेष म्हणजे हा एलटीई वाल्ट फिचर असलेल्या फोनची किंमत 1500 रुपयांच्या आत असणार आहे.  सध्या सर्वात स्वस्त 4जी फोन हा 3000 रुपयांत सध्या बाजारात उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या या वॉल्ट फिचर असलेल्या या मोबाईल फोनमध्ये फ्रंट कॅमेरा असून, मोठ्या प्रमाणात अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये जिओ चॅट, लाइव्ह टीव्ही आणि व्हिडीओ सारखे फिचर मिळण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनमध्ये डिजिटल वॉलेट सुविधा, जिओ मनी वॉलेट सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.