गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. स्मार्टफोनमधील प्लेस्टोअर वरून विविध अ‍ॅप डाऊनलोड करणे आपल्याला नेहमीच आवडते. त्यापैकी अनेक अ‍ॅप ही एकतर गेम अ‍ॅप असतात किंवा सोशल मीडिया, तसेच ऑनलाइन सेवा पुरवणारी असतात. आपण डोऊनलोड केलेल्या अनेक अ‍ॅपपैकी बरीच अ‍ॅप अत्यंत हेवी असतात. तसेच स्मार्टफोनच्या स्पीडवरही परिणाम करणारी असतात. म्हणूनच अशा प्रकारची कोणती अ‍ॅप्स आहेत जी आपला स्मार्टफोन हँग करण्यास किंवा बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरतात? हे माहीत असायला हवे. म्हणूनच जाणून घ्या
 
Candy Crush Saga
कँडी क्रश सागा हे एक गेमिंग अ‍ॅप आहे. तरूणाईसोबतच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपचे बळी ठरले आहेत. क्लासरूम, घर, ट्रेनप्रवास इतकेच नव्हे तर जागा मिळेल तेथे अनेक मंडळी Candy Crush Saga वर गेम खेळण्यात मग्न असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का हे अ‍ॅप तुमच्या फोनच्या बॅटरीवर तर परिणाम करतंच. पण, तुमच्या फोनची स्पेसही खूप खातं. त्यामुळे तुमच्या फोनचा डेटा उगाच वाया जातो.
 
Pet Rescue Saga
हे अ‍ॅपही वाटते तितके साधे नाही. या अ‍ॅपुमुळेही तुमच्या मोबाइलची बॅटरी, स्टोरेज आणि डेटा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. याचा परिणाम मोबाइलच्या कार्यप्रणालीवर होऊन त्याचा वेग मंदावतो.
 
Clash of Clans
केवळ टाइमपास आणि मनोरंजन म्हणून डाऊनलोड केलेले हे अ‍ॅप खूप बॅटरी खाते. चार्जिंगसाठी सतत चार्जर सोबत ठेवण्यास हे अ‍ॅप प्रवृत्त करतं.
 
Google Play Services
प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप डाऊनलोडचे प्रमाण मोठे आहे. हे अ‍ॅपही तुमच्या मोबाइलची बॅटरी, स्टोरेज आणि डेटा खाते. एव्हीजीनेही याबाबत दुजोरा दिला आहे.
 
Olx 
हे एक ऑनलाइन सेवा देणारे अ‍ॅप आहे. पण, तुम्ही या अ‍ॅपच्या प्रेमात असाल तर, मोबाइलची बॅटरी, डेटा आणि स्टोरेज खर्च करण्यात तयार राहा.
 
Facebook
सोशल मीडियात क्रमांक एकवर असलेले हे अ‍ॅप तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. जगभरात कोणत्याच सोशल साईटकडे नसतील इतके यूजर्स हे अ‍ॅप यूज करतात.
 
Whatsapp
जास्त स्पेस खाणार्‍या अ‍ॅपच्या यादीत व्हाट्‌सअ‍ॅपचे नाव पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. स्मार्टफोन वापरतोय पण व्हाट्‌सअ‍ॅप वापरत नाही. फेसबुक प्रमाणेच हे अ‍ॅपही जास्त डेटा, स्टोरेज आणि मोबाइलची बॅटरी खाते.
 
Lookout Security antivirus
आपला स्मार्टफोन हँग होतोय म्हणजे त्याला व्हायरस लागला आहे, असा बहुधा अनेकांचा गैरसज असतो. पण, तो खरा असतोच असे नाही. 
स्मार्टफोन हँग व्हायला केवळ व्हायरसच कारणीभूत असत नाही. तर, मोबाइलमध्ये असणारी अ‍ॅपही कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही जर Lookout Security antivirus  हे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर त्यामुळेही मोबाइलचा डेटा आणि बॅटरी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.
 
Android weather clock widget
हे अ‍ॅपही मोबाइलचा डेटा, स्टोरेज आणि बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरते.
 
Solitaire
हे एक गेमिंग अ‍ॅप असून, तुमच्या मोबाइलची बॅटरीखाण्यास कारणीभूत ठरते.