शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (09:45 IST)

पहिल्यांदाच माथेरान मिनी ट्रेनला महिला चालक

माथेरान मिनी ट्रेनच्या १११ वर्षाच्या इतिहासात पहील्यांदाच आणि नॅरोगेज रेल्वेच्या इतिहासात सुद्धा पहिल्यांदाच चालक म्हणून एका महिलेला संधी मिळाली. नेरळ माथेरान मिनीट्रेन या गाडीवर शुभांगी खोब्रागडे या महिलेने साहाय्यक चालक म्हणून काम करत हे आव्हान स्वीकारले.
 
गेल्या ६ वर्षांपासून कुर्ला येथील डिझेल लोको शेडमध्ये कार्यरत असलेली नागपूरची कन्या शुभांगी खोब्रागडे यांची नियुक्ती २० जूनपासून नेरळ माथेरान सेक्शनमध्ये नेरॉगेज रेल्वे मार्गावर साहाय्यक चालक म्हणून करण्यात केली. यावेळी वरिष्ठ पायलट आर.जी.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनची यशस्वी सफर करून नवा इतिहास घडविला आहे. यावेळी नेरळ येथून मिनी ट्रेन घेऊन दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रवास सुरू केला आणि सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास माथेरान स्थानकात मिनी ट्रेन येऊन विसावली. या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती झाल्याने मी स्वतःला नशीबवान समजते असे समाधान व्यक्त करत आपला विलक्षण अनुभव यावेळी शुभांगी खोब्रागडे यांनी सांगितला.