बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लज्जास्पद, ओला चालकाने काढवले महिलेचे कपडे, गँगरेपची धमकी

बंगळूरु- एका धक्कादायक बातमीप्रमाणे ओला कॅब ड्राइव्हरने एक जून रोजी विमानतळाकडे जात असताना एका महिलेची छेड काढली आणि तिला कपडे काढण्यासाठी बाध्य केले, मोबाइलने तिचे फोटो काढले आणि मित्रांना बोलावून तिला गँगरेपची धमकी दिली.
 
पोलिसाप्रमाणे बंगळूरु पोलिसांना ईमेल च्या माध्यमातून आलेल्या तक्रारीवरून चालकाला अटक करण्यात आली आहे और तक्रार नोंदवली गेली आहे. महिला मंगलूरु रहिवासी असून येथे आर्किटेक्ट म्हणून काम करते आणि एक जून रोजी तिने विमानतळावर जाण्यासाठी कॅब बुक केली होती. रस्त्यात चालक अरुण वी.कार तिला सुनसान जागेवर घेऊन गेला. त्याने सर्व दारं खिडक्या बंद केल्या. महिला ओरडली तर तिला गंभीर परिणाम भुगतावे लागतील अशी चेतावणी दिली.
 
प्राथमिकी प्रमाणे चालकाने तिचा गळा घोटण्याचाही प्रयत्न केला आणि चेतावणी दिली की त्याच्या सांगितल्याप्रमाणे वागलीस नाही तर मित्रांना बोलावून गँगरेप करेन. महिलेने आरोप लावला की चालकाने छेड काढत तिला कपडे काढण्यासाठी मजबूर केले आणि मोबाइलने फोटोही काढले. विमानतळावर उतरवताना धमकीही दिली की तक्रार केल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील.
 
अतिरिक्त पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी म्हटले की विमानतळावर पोहचल्यावर महिलेने मेलद्वारे तक्रार नोंदवली. नंतर ड्रायवरला अटक करून कार जप्त केली गेली. त्यांनी ओला कॅबला नोटिस पाठवून विचारले की चालकाचे पोलिस सत्यापन का केलेले नाहीत?
 
ओला प्रवक्त्याने म्हटले की ग्राहकाला झालेल्या दुर्भाग्यपूर्ण अनुभवासाठी आम्ही खेद प्रकट करतो. या प्रकाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही आणि तक्रार मिळताक्षणी चालकाला आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित केले गेले आहे. वक्तव्यात म्हटले गेले आहे की ग्राहकांची सुरक्षा आमची शीर्ष प्राथमिकता आहे आणि चौकशीत आम्ही पोलिस अधिकार्‍यांची पूर्णपणे सहयोग करण्यात येईल. चालकाकडे वैध पोलिस सत्यापन असल्यामुळे त्याविरुद्ध कोणतेही आपराधिक प्रकरण नोंदलेले नाहीत याची पुष्टी झाली आहे.