मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 जून 2018 (11:16 IST)

मुंबईत 8 ते 10 जूनला मुसळधार पाऊस : स्कायमेट

मुंबईत पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी या आठवड्यातील 8, 9 आणि 10 जूनला मबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. या तीन दिवसात मुंबईची 'लाइफलाइन' कोलडण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी आधीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
मुंबईत या तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असून याआधीचे पावसाचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
 
सोमवारी मुंबईत पहिला पाऊस पडला. पहिल्याच पावसात 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यावर ट्रॅफ्रिक जॅम झाले होते.