गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:32 IST)

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर : करा लाईव्ह लोकेशन शेअर

यापुढे व्हॉट्सअॅप वरुन तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरून लोकं तुमच्याशी खोट बोलत असल्याचा संशय तुम्हाला वारंवार येत असेल. तर लाईव्ह लोकेशन फीचरमुळे त्यांची पोलखोल करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या Live Location फीचरमुळे तुम्ही लोकेशन शेअर केला आणि तुमचा प्रवास सुरु असेल, तर तुमचं लाईव्ह लोकेशन कळू शकेल. Live Location हे कोणालाही पर्सनल व्हॉट्सअॅप किंवा ग्रुपवर पाठवू शकता. ठराविक काळासाठी हे फीचर काम करेल. काही वेळानंतर पुन्हा तुम्हाला लोकेशन शेअर करावं लागू शकतं.

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन, Attach वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय दिसेल तो निवडा. त्यानंतर तुम्हाला कालमर्यादा विचारली जाईल. यामध्ये 15 मिनिट, 1 तास आणि 8 तास असे पर्याय दिसतील, तो आपल्या सोईनुसार निवडा. लाईव्ह लोकेशन तुम्ही म्यॅनुअली बंद करु शकता.