1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

व्हॉट्स अ‍ॅपचे डिलिट केलेले मेसेजही वाचा

व्हॉट्स अ‍ॅप वर आता डिलिट केलेले मेसेजही वाचू शकता.अलीकडेच व्हॉट्स अ‍ॅप युजर्ससाठी ‘डिलिट फॉर एव्हरीवन’ हे फीचर सादर केले होते. हे फीचर लाँच झाल्यानंतर तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज 7 मिनिटांच्या आत डिलिट केल्यास तो मेसेज पाठवणार्‍यांपर्यंत पोहोचणार नाही, असा दावा कंपनीने केला होता. त्याचबरोबर असेही सांगण्यात आले होते की, जोपर्यंत समोरची व्यक्‍ती तो मेसेज वाचत नाही तोपर्यंत हे फीचर उपयुक्‍त ठरेल. 
 
खूप कमी लोकांनी या फीचरचा लाभ घेतला असेल. मात्र, एक प्रश्‍न उरतो तो म्हणजे डिलिट केलेलं मेसेज फोनमधून गायब होतात का ? मात्र नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार असे दिसून आले आहे की, डिलिट केलेले मेसेज डिव्हाईसवर राहतात आणि ते तुम्ही अगदी सहज वाचू शकता.
 
यासंदर्भात स्पेनच्या ब्लॉग अ‍ॅनरॉईड जेफे यांनी दावा केला आहे की, डिलिट केलेले मेसेज हँडसेटच्या नोटिफिकेशन लॉगमध्ये उपलब्ध असतात. हे मेसेज बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अ‍ॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर अ‍ॅनरॉईड नोटिफिकेशन लॉगमध्ये मेसेज सर्च करा.