गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (15:52 IST)

जन्माष्टमीचे उपाय

तंत्र शास्त्रानुसार कुठलीही सिद्धी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी चार रात्र सर्वश्रेष्ठ मानण्यात आल्या आहे. यात पहिली कालरात्री आहे, ज्याला नरक चतुर्दशी किंवा दीपावली देखील म्हणतात. दुसरी अहोरात्री किंवा शिवरात्री आहे. तिसरी दारुणरात्री किंवा होळी आहे आणि चौथी मोहरात्री किंवा जन्माष्टमी आहे.   
 
शास्त्रानुसार श्री कृष्णाची बायको रुक्मणी देवी लक्ष्मीचा अवतार होती म्हणून या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले तर  लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर आपली कृपा कायम ठेवते. जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने कराल तर तुम्हाला त्याचे अभीष्ट फळांची प्राप्ती होईल.
 
1. जर तुम्हाला नोकरीत प्रमोशन होत नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी सात बालिकांना घरी बोलावून खीर खाऊ घालावे. हे काम पाच शुक्रवार करायला पाहिजे.
 
2. आर्थिक संकट निवारण आणि धन लाभासाठी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नाना‍दी करून राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन कृष्णाला पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पित करावा. यामुळे आर्थिक संकट दूर होऊ लागतात आणि धन लाभाचे प्रबळ योग बनू लागतात.
 
3. श्रीकृष्णाला पीतांबर धारीपण म्हणतात, पितांबरी धारीचा अर्थ आहे जो पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करतो. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी एखाद्या मंदिरात देवाला पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळे फळ, पिवळे धान्य व पिळवी मिठाई दान केल्याने कृष्ण व लक्ष्मी दोन्ही प्रसन्न होतात, त्या जातकाला जीवनात धन आणि यश भरपूर प्रमाणात मिळत.
 
4. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला विड्याचे पान अपिर्त करून त्या पानावर श्री मंत्र लिहून त्याला आपल्या तिजोरीत ठेवावे. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही धनाभाव राहणार नाही.
 
5. जन्माष्टमीची रात्री 12 वाजता कृष्णाला केशर मिश्रित दुधाने अभिषेक केल्याने जीवनात स्थायी रूपेण सुख समृद्धीची प्राप्ती होते.
 
6. जर कर्ज असेल तर स्मशानाच्या विहिरीचे पाणी आणून पिंपळाच्या झाडाला जन्माष्टमीपासून नेमाने सहा शनिवार चढवा.
 
7. लक्ष्मी कृपेसाठी जन्माष्टमीच्या दिवशी केळीचे दोन पौधे लावून द्या. नंतर त्याची नेमाने देखरेख करा. जेव्हा पौधे फळ देऊ लागतील तेव्हा यांचे दान करा, स्वयं या फळांचे सेवन करू नका.
 
8. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन तुळशीमाळाने खाली दिलेल्या मंत्राची 11 माळ जपा. या उपायाने तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान होऊ शकत. मंत्र- क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी: परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः
 
9. जन्माष्टमीच्या संध्याकाळी तुळशीला गायीच्या दुधाचा दिवा लावा आणि ॐ वासुदेवाय नमः मंत्र बोलून तुळशीची 11 परिक्रमा करा.