गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. कतरीना
Written By वेबदुनिया|

मला छोटे स्कर्ट घालायची गरज नाही- कतरीना

IFM
कैतरीना कैफने काही दिवसांपूर्वीच करीना कपूरवर टीका केली होती. पण आता ती करीनाचं भरभरून कौतुक करतेय. त्याचवेळी 'लोकांना आकर्षित करण्यासाठी छोटे स्कर्ट परिधान करण्याची आणि आपले पाय दाखविण्याची गरज नाही, असे वक्तव्य करून करीनाला 'टार्गेट'ही करतेय.

कम्बख्त इश्कमध्ये करीना अल्पवस्त्रांकित आहे. त्यामुळे कतरीनाने करीनावरच टीका केली असल्याचे मानले जातेय. पण कतरीना म्हणतेय की ती करीनाची मोठी फॅन आहे. या चित्रपटातील अभिनयाबद्दलही तिने करीनाची तारीफ केलीय.

न्यूयॉर्कच्या यशस्वीतेने कतरीना खूपच खूष आहे. न्यूयॉर्कची कथा वेगळी आहे आणि म्हणूनच तो एक वेगळा चित्रपट असल्याचे ती म्हणते. यात चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केल्याचे ती सांगते.

आता कतरीना प्रियदर्शनच्या 'दन दना दन' मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटादरम्यान ती चार वेळ जखमी झाली. 'पाठ व मान अजूनही दुखते असं ती सांगते. अक्षय कुमार याही चित्रपटात तिच्याबरोबर आहे. आम्ही एवढे रक्त सांडलेय मग चित्रपट का हिट होणार नाही, असा सवाल अक्षय कुमार करतो.