येथे 21 विषारी साप देऊन मुलीला पाठवतात सासरी  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  लग्नात नवीन सून आपल्यासोबत दागिने, कपडे, गाडी, रक्कम सोबत आणते परंतू एक जागी अशी देखील आहे जिथे मुलीकडील लोकं हुंड्यात विषारी साप देतात. हैराण करणारी ही परंपरा मध्यप्रदेशातील एका गावाची आहे. जिथे आजही लेकीला हुंड्या म्हणून बिषारी साप दिले जातात. 
				  													
						
																							
									  
	 
	मुलीला सासरी पाठवताना वडिलांना 21 विषारी साप द्यावे लागतात. हे साप इतके विषारी असतात की एखाद्या व्यक्तीला दंश केला तर मृत्यू होऊ शकतो. परंतू असे केले नाही तर मुलीच्या आयुष्यात दु:ख येऊ शकतात अशी समजूत आहे. येथील गौरेया समाजात ही प्रथा आहे. हुंड्यात दिले जाणारे साप हे गहुआ आणि डोमी प्रजातीचे असून अत्यंत विषारी असतात.
				  				  
	 
	त्यातून विशेष म्हणजे साप पकडण्याची जबाबदारी ही मुलीच्या वडिलांची असते. लेकीसोबत साप दिले नाही तर लग्न मोडू शकतं किंवा काही अप्रिय घटना घडू शकते अशी शंका मनात असल्यामुळे ही परंपरा आजही पाळली जात आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	गौरेया समजातील लोकं साप पकडण्याचंच काम करतात. ते साप पकडून सापाचे खेळ दाखवतात हेच कारण असावं की मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून जावयाला विषारी साप दिले जातात. मुलीचं लग्न ठरलं की वडिला साप पकण्याचे काम सुरु करुन देतात. वनविभागाकडून या परंपरेबद्दल असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा खूप प्रयत्न केला गेला तरी ही प्रथा सुरु आहे. 
				  																								
											
									  
	 
	या समजातील लोकांना साप सुरिक्षत राहावे यासाठी कठोर नियम तयार केले गेले आहे. म्हणतात की जर सापाचा त्यांच्या पिटार्यात मृत्यू झाला तर पूर्ण कुटुंबाचे केस काढावे लागतात. तसेच समाजातील सर्व लोकांचे भोज आयोजित करावं लागतं.