गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आधारकार्ड बनविण्यात अनोखा रेकॉर्ड

महाराष्ट्रातील आईवडिलांनी आधारकार्ड बनविण्यात अनोखा रेकॉर्डच केला आहे. पालकांनी जन्म झाल्यानंतर अवघ्या १ मिनिटं ४८ सेकंदांनी आपल्या अपत्याचं नाव आधारकार्डसाठी रजिस्टर केल आहे. गेल्या १८ एप्रिलला बुलढाण्यातील खामगावात एका महिलेने मुलीला जन्म दिला. या मुलीचा जन्म झाल्यानंतर १ मिनिटे आणि ४८ सेकंदांनी तिचं नाव आधारकार्डसाठी तिच्या वडिलांनी रजिस्टर केलं. देशातील पहिल्यादाच एवढ्या कमी वेळात एखाद्या लहान मुलाचं नाव आधार कार्डसाठी रजिस्टर झालं आहे.
 
याआधी रायपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या हिमांशू नावाच्या मुलाचं आधार कार्ड बनवण्यात आलं होतं. हिमांशूला ब्लड कॅन्सर होता. हिमांशूचे वडील शेतकरी होते, त्यांना मुलाच्या उपचारासाठी २ ते ३ लाख रूपये हवे होते. पैसे नसल्याने त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितलं, त्यांनी संजीवन निधीतून पैसे मिळतील, पण मुलाचं आधार कार्ड हवं असं सांगितलं, तेव्हा त्या मुलाचं हॉस्पिटलमध्येच आधारकार्ड बनवण्यात आल होत.