शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (08:38 IST)

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला 2 मिलिअन व्ह्यूज

amruta fadnavis
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आज हे गाणं सारेगम या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. 'वो तेरे प्यार का गम' असं या गाण्याचं नाव आहे. 'माय लव्ह' या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे. अमृता यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' हे जुन्या गाण्याचंच रिक्रिएटेड वर्जन आहे
 
'वो तेरे प्यार का गम' या गाण्याच्या रिक्रिएट वर्जनचे बोल अमृता फडणवीस यांचे आहेत. तसेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्या स्वतः हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता यांनी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. हे नवं गाणं ऐकता काहींनी त्यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
 
या गाण्याला 5 तासांमध्येच 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 'माय लव्ह' या चित्रपटामधील हे गाणं याआधी आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. तर सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी ते गायलं होतं. आता अमृता यांनी पुन्हा या गाण्याच्या आठवणींना आपल्या आवाजाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.