बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (08:48 IST)

बिग बी झाले 'ट्रोल'

मार्वल स्टुडिओजचा ‘ॲवेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र बिग बींनी ट्विटरवरुन हा चित्रपट समजला नसल्याचे ट्विट केले. जगभरात या चित्रपटाचे कौतुक होत असताना अमिताभ यांच्या अशा प्रतिक्रियेनंतर त्यांना ट्विटरवर ट्रोल केले गेले.
 

ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी "अच्छा भाई साहेब, बुरा ना मानना, एक पिक्चर देखने गाए , 'AVENGERS'... कुछ समझ में नहीं आया की picture में हो क्या रहा है  !!!" अशा शब्दांत चित्रपट समजला नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या ट्विटला हजारपेक्षा जास्त वेळा ट्विट केले आहे. यावर युजर्सनी  अमिताभ बच्चन यांची टर उडवली आहे.