बॉबी डार्लिंगने २०१६मध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर व्यवसायिक रमणिक शर्मा याच्याशी लग्न केले होते. त्यानंतर एक वर्ष होत नाही तोच बॉबीने पतीच्या छळाला कंटाळून भोपाळमधून पळ काढला आणि तिच्या माहेरी म्हणजेच दिल्लीला पोहोचली. तिथे जाऊन तिने पोलिसांत तक्रार केली. दुसरिकडे हे सर्व आरोप म्हणजे बॉबीचा पब्लिसिटी स्टंट आहे, असा दावा रमणिकने केला होता. परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये बॉबीने केलेले सर्व आरोप हे खरे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.