Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुराणात एक डोळा असलेल्या ‘दज्जाल’ चा उल्लेख, काय खरंच जन्म झालाय...

Updated: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (12:08 IST)
 
व्हायरल पोस्ट-
Srk khan नावाच्या फेसबुक यूजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की- ‘कुराणमध्ये अल्लाह पाक ने सांगितले आहे की इस्राएलमध्ये दज्जलचा जन्म होईल ज्याला एकच डोळा असेल. आता इस्राएलमध्ये हे मुलं जन्माला आलं आहे... अल्लाह आम्हा सर्वांचे रक्षण करा. खरं आणि पक्की तौबा नशीब द्यावे. आमीन.
 
हा व्हिडिओ आता पर्यंत 15 हजाराहून अधिक लोकं बघून चुकले आहेत. अशात इतर अनेक यूजर्स अशाच कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करत आहेत.
 
 
 
जाणून घ्या दज्जाल बद्दल-
इस्लाम धर्माची पवित्र पुस्तक कुराण यानुसार कयामत येण्याची खूण आहे ‘दज्जाल’ चं येणे. तो एका डोळ्याचा असेल. त्याच्या दोन्ही डोळ्याच्या मधे ‘काफिर’ असे लिहिलेलं असेल, ज्याला प्रत्येक मुस्लिम वाचू शकेल मग तो अशिक्षित का नसो. परंतू एक काफिर ते बघू शकणार नाही. तो आपल्या खुदाईचा दावा करेल. त्याला खुदा समजणारा स्वत:ला जन्नतमध्ये ठेवेल आणि त्याला नकारणारा जह्नम मध्ये टाकण्यात येईल.
दज्जालबद्दल लिहिले आहे की तो येईल तेव्हा जगातील वाईटपणा आपल्या चरमवर पोहचलेला असेल. चारीकडे कत्तल, रक्तपात आणि गलिच्छ अबी पसरत असतील. दज्जाल आल्यावर या सर्वांत अधिकच भर पडेल. शेवटी ईसा अलैहिस्सलाम पुन्हा पृथ्वीवर येतील आणि दज्जालचा खात्मा करतील.
 
व्हायरल व्हिडिओ सत्य-
आम्ही सर्वात आधी ‘एक डोळा असणारं मुलं’ इंटरनेटवर सर्च केलं तर हा व्हिडिओ 2013 साली पासून शेअर होत असलेलं समोर आलं.
 
खरं तर हा मुलगा अत्यंत दुर्लभ आजराने ग्रस्त आहे, ज्याचं नाव – CYCLOPIA. या आजारात चेहर्‍यावर एकचं डोळा असतो. डॉक्टरांप्रमाणे मुलं गर्भात असताना अधिक रेडिएशनच्या संपर्कात आल्याने या प्रकाराचा आजार उद्भवतो. अशात हृद्याचा आकार देखील योग्य आकारात नसतं. या आजरासह जन्माला आलेलं मुले अधिक काळ जिवंत राहत नाही आणि जन्माच्या काही वेळानंतरच मरण पावतात.
 
हा आजार जनावरांमध्ये असल्याचं देखील बघितले गेले आहे. याचे नाव CYCLOPIA असून इजिप्तच्या एक डोळा असणार्‍या पौराणिक दैत्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
 
वेबदुनिया तपासणीत हा दावा खोटा असल्याचं आढळले. व्हिडिओत दिसत असलेल्या मुलाला CYCLOPIA आजार आहे आणि ‘दज्जाल’ सह त्याचा कुठलाही संबंध नाही. तरी हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

समय रैना यांनी महाराष्ट्र सायबर सेलवर विनोद केला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसू आवरू शकले नाहीत

भाचीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाची निघृण हत्या; मामा पोलिसांच्या ताब्यात

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

२१ वर्षीय मॉडेलची थरारक हत्या; घरात घुसून जिम ट्रेनर इम्रानने संपवले मुस्कानचे आयुष्य!

Nepal Flash Flood तिबेटमध्ये ५५८ लोक बेपत्ता, तर नेपाळमधील या दुर्घटनेत मृतांची संख्या १६२ वर पोहोचली

पुढील लेख
Show comments