शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:51 IST)

आणखी एक गिफ्ट, ग्रॅच्युइटीवर जास्त फायदा

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, गैर-सरकारी प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवरचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढवून 8 टक्के करण्यात आहेत. नवे व्याजदर 31 डिसेंबर 2018च्या तिमाहीसाठी लागू असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयानं 4 ऑक्टोबरला स्पेशल डिपॉझिट स्कीम(एसडीएस)1975च्या अंतर्गत संशोधन करून हे नवे व्याजदर लागू केले आहेत. 
 
एसडीएसचे व्याजदर वाढवल्यानं गैर-सरकारी पीएफ, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवर निश्चित स्वरूपात जास्त फायदा मिळण्यास मदत होणार आहे. या फंडांमध्ये गुंतवणूक करणा-या कर्मचारी आणि लाभार्थ्यांना मोठ्या कालावधीसाठी फायदा मिळणार आहे. परंतु त्यांना सरकार आणि गुंतवणुकीच्या निर्देशांचं पालन करावं लागेल. त्यामुळे आता नोकरी करणा-यांना ग्रॅच्युइटीवर जास्त फायदा मिळणार आहे.