शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified शनिवार, 2 जून 2018 (08:43 IST)

अंटार्क्टिकात सापडले बर्फाखालील खोरे

अंटार्क्टिकामध्ये जमा बर्फाखाली दडलेली एक पर्वतरांग आणि तीन खोल खोर्‍यांचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेच्या पोलर गॅप प्रोजेक्टअंतर्गत हे संशोधन करण्यात आले असून बर्फाखाली आच्छादलेल्या या पर्वतरांगेचा शोध घेण्यासाठी रडारचा वापर करण्यात आला होता. पृथ्वीचा पृष्ठभाग व आतील भागांचे विश्र्लेषण करण्यासाठी उपग्रहांद्वारे प्राप्त बरीचशी माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र दक्षिण ध्रुवाजवळचे काही भाग आजवर उपग्रहांच्या कक्षेबाहेर होते. या क्षेत्रांच्या तपासणीसाठी पोलर गॅप प्रोजेक्टअंतर्गत तिथल्या नैसर्गिक व कृत्रिम क्षेत्राचा शोध घेण्यात आला. ब्रिटनमधील नॉर्थमब्रीया विापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, पर्वतरांगा पूर्व अंटार्क्टिकात‍ वितळणार्‍या बर्फाला पश्चिम अंटार्क्टिकापर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहे, मात्र जलवायू परिवर्तनामुळे बर्फाची चादर झपाट्याने वितळेल व पाण्याचा प्रवाह वेगवान होईल. तोपर्यंत नव्याने शोध लागलेल्या तिन्ही खोर्‍यांच्या मार्गाने पाणी किनार्‍यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे समुद्राची पातळीही वाढेल. 350 किलोमीटर लांब व 35 किलोमीटर रुंदीच्या या खोर्‍यांमध्ये फाउंडेशन ट्रॉफ सर्वात मोठे आहे. त्याची लांबी लंडन ते मँचेस्टरदरम्यानच्या अंतराएवढी तर रुंदी न्यूयॉर्क ते मॅनहॅट्टन बेटापेक्षा निम्मी आहे.