भारतीय नौदल

Last Modified बुधवार, 4 डिसेंबर 2019 (11:32 IST)
4 डिसेंबरला भारतीय नौदलदिन असतो. 1971 मध्ये भारताच्या नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानवरच्या नेव्हीचे उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडंट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौदल हा 'नेव्ही डे' साजरा करते.
भारतीय नौदलाची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू झाली. कान्हाजी आंग्रे यांचे नौदलामध्ये मोठे योगदान असल्यामुळे आजही आयएनएस या नावाने नौदलाची ओळख ठेवण्यात आली आहे. शिवाजी राजांनी समुद्रामार्गाचे महत्त्व त्याकाळी जाणले. उत्तर भारताकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. जिथून मुघलानी भारतात पाय ठेवलले त्या प्रांताच्या सुरक्षेवर करडी नजर ठेऊन शत्रूला धूळ चारण्याचे काम शिवरायांनी त्या काळी केले. तेव्हापासून नौदलाचे महत्त्व आपल्या देशात आहे.
भारताला लाभलेल्या भौगोलिक रचनेमुळे नौदल अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली. जगातला सर्वात मोठा असा हिंदी महासागर ज्यामधून जगाचा 80 टक्के व्यापार होतो. मध्य-पूर्व आशियापर्यंत महासागर पसरलेला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेमुळे देशातली नऊ राज्ये ही समुद्रकिनार्‍या जवळ आहेत. त्या प्रांतातील सर्वात मोठे उद्योग हे समुद्रकिनारी आहेत. आज मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात होते. या सर्वामध्ये नौदलाची जबाबदारी मोठी आहे.

नौदलाची यंत्रणा सक्षम आहे. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना यामध्येही काही अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रोग करणे ही काळाची गरज ठरणार आहे. कारण जगभरात आतंकवादी हल्ले वाढताना दिसत आहेत. भारतामध्ये आलेले बहुतेक शत्रू हे सागरी मार्गानेच आल्याचा इतिहास आहे. याचा आढावा घ्यायचा झाल्यास ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले ते ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने समुद्र मार्गानेच आले होते.
अ. खाडिलकर


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ...

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली
महाराष्ट्र सरकारने आज नव्याने निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

सोयाबीनचे भाव वाढूनही शेतकरी खूश नाहीत, जाणून घ्या संपूर्ण ...

सोयाबीनचे भाव वाढूनही शेतकरी खूश नाहीत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सोयाबीनची आवक कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार ...