गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 9 मे 2018 (12:53 IST)

आता रेल्वेचं ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी ‘आधार लिंक’करावे लागणार

रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय होऊ शकतो. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
 
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन तिकिटांमध्ये फेरफार करणाऱ्या एजंटला रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईत ३ मे रोजी अटक केली होती. त्यावेळी आरोपीची चौकशी करण्यासाठी आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी रेल्वेचे दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकारी सोमवारी मुंबईत आले होते. आरोपीची कार्यपद्धती समजून घेऊन तयार केलेला प्रस्ताव त्यांनी रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.