सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आजारापासून दूर राहण्याची अनोखी पद्धत

इंडोनेशियाची राजधानी जाकार्तातील लोक आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भलताच मार्ग जवळ करत आहेत. आजार दूर ठेवण्यासाठी डॉक्टरी सल्ला घेण्याऐवजी ते चक्क रेल्वेरुळावर झोपतात. मात्र रेल्वेगाडी जाणार्‍या नाही तर त्या शेजारील रुळाचा वापर करण्याची खबरदारी ते घेतात. असे केल्याने विविध व्याधी दूर होतात, अशी त्यांची धारणा आहे. रुळावर झोपल्याने शेजारून जाणार्‍या रेल्वेगाडीमुळे उत्पन्न होणार्‍या विद्युतीय लहरींचा शरीरात प्रवेश होतो व आजारपण दूर होते, असे त्यांचे म्हणणे आहे. या उपचारपद्धतीचा अनेकांना प्रत्ययही आला आहे. असा उपचार करून घेणार्‍या एका महिलेला 13 वर्षांपासून मधुमेह होता. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्यात काहीच फरक पडला नाही. मात्र रेल्वेरुळाचा मार्ग धरताच आता खडखडीत बरी झाली असल्याचा दावा ती करते. एका चिनी व्यक्तीच्या अनुभवानंतर जाकार्तावासियांनी ही उपचारपद्धती जवळ केली. अपंगत्वाने त्रस्त झालेला हा इसम आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर गेला होता, पण आत्महत्या न करताच तो परतला. कारण तिथे झोपल्यानंतर सगळ्या व्याधी दूर झाल्याचे त्याला जाणवले. तेव्हापासून इथले लोक या चमत्कारावर भरवसा ठेवत असून अनेकांना त्याची प्रचिती आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.