रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:27 IST)

रामराज्य मागितलं होतं, मंदिर नव्हे; राज ठाकरेंचा सेना, भाजपावर व्यंग अस्त्र

मनसे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका करत त्यांच्या व्यंगचित्रातून घणाघात केला आहे. राम मंदिर प्रश्नावर जे वातवरण केले जातंय त्यावर टीका केली आहे. यामध्ये श्री राम आणि लक्ष्ममन दाखवले आहेत. तर समोर उद्धव ठाकरे, भाजपा , हिंदू परिषद असून त्यांना राम सांगत आहेत की मला राम मंदिर नको मला राम राज्य हवे.
 
''देशवासियांनी तुमच्याकडे रामराज्याची मागणी केली होती राम मंदिराची नव्हे, असा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रामधून हाणला आहे. हे राम अशा शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी उन्मादी हिंदुत्वावर टीका केली आहे. या चित्रामध्ये राम आणि लक्ष्मण हिंदुत्ववाद्यांकडे हताशपणे पाहत आहेत, तसेच अहो तुम्ही देश खड्ड्यात घातलाय, मग आता माझ्या नावाने का गळे काढत आहात. लोकांनी तुमच्याकडे राम राज्याची मागणी केली होती. राम मंदिराची नव्हे, असे श्रीराम या हिंदुत्ववाद्यांना विचारत आहेत." त्यामुळे मनसे प्रमुख यांनी जसे पुतळा उभारणीला विरोध होता तसा राम नावाचा आधार घेत होत असेलल्या राजनीतीला विरोध आहे असे स्पष्ट केले आहे.