गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

भांडी घासणारा अफलातून रोबो

धुणे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आल्यावर अनेक गृहिणींना दिलासा मिळाला होता. मात्र, भांडी घासण्यासाठी अद्याप घरगुती साधन न आल्याने ही कटकट कायम होती. आता त्यावर संशोधकांनी उपाय शोधला आहे. या कामासाठी त्यांनी एक रोबो बनवला असून, तो अवघ्या तीनच सेकंदांमध्ये खरकट्या थाळ्या स्वच्छ करू शकतो! 'रोबोंचे माहेरघर' असलेल्या जपानमध्ये हा रोबो बनवण्यात आला आहे. कंपनीने त्याला 'कुरू सारा वॉश' असे नाव दिले असले तरी त्याला 'स्क्रबिंग रोबो' म्हणूनच ओळखले जात आहे. हा रोबो मानवाकृती नसून एखाद्या यंत्रासारखाच साधारण आहे. मात्र, आपले काम अतिशय सफाईदारपणे आणि जलद गतीने करतो. काही सेकंदांमध्येच तो भांडी स्वच्छ करतो. त्याचे ब्रिसल्स भांड्यातील तेलकटपणा, अस्वच्छता दूर करतात. या यंत्रामुळे वेळेची बचत होते आणि हातही सुरक्षित राहतात. जपानमध्ये या रोबोची किंमत आहे अवघी 5300 रुपये. हे यंत्र बॅटरीच्या साहाय्याने काम करते. ही बॅटरी रिचार्ज करता येऊ शकते. त्याच्या एका भागात साबण ठेवला जातो. त्यानंतर तीन ते दहा सेकंदांच्या काळातच ते भांडी स्वच्छ करते.