रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified सोमवार, 4 जून 2018 (15:00 IST)

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, तमिळ अभिनेत्रीला अटक

चेन्नई पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एका तमिळ अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. टीव्ही मालिका वीनी रानीची अभिनेत्री संगीता हिला पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसॉर्टमधून अटक करण्यात आलीये.  संगीतासह आणखी तीन अभिनेत्री या सेक्स रॅकेटमध्ये सामिल आहेत. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
 

पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती की, या रिसॉर्टवर सेक्स रॅकेट सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी इथे धाड टाकली. तेव्हा येथून पोलिसांनी संगीता आणि तिच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री संगीतासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीही सामिल आहेत. संगीताने तमिळ सिनेमातही काम केलं आहे. संगीताचं पूर्ण नाव संगीता बालन असं आहे.