गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:14 IST)

वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या गर्दीची शक्यता

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला श्रीलंकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री लक्ष्मण किरियेला हे उपस्थित राहणार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला देश-विदेशातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरियेल्ला हे देखील उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
 
दिल्लीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा निघणार असून या काळात दिल्लीतील काही महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील याच्या सूचना दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्या आहेत. मध्य दिल्लीकडे जाणारे जवळपास सर्वच मार्ग सकाळी ८ वाजल्यापासून बंद राहणार आहेत. यामध्ये कृष्णा मेमन मार्ग, अकबर रोड, जनपथ आणि इंडिया गेट या मार्गांचा समावेश आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांसाठी पुढील मार्गही बंद राहणार आहेत.
 
कृष्ण मेमन मार्ग, सुनहरी बाग रोड, तुघलक रोड, अकबर रोड, टीस जानुअरी मार्ग, जनपथ (क्लॅरिडगेस हॉटेल ते विंडसर प्लेस), मानसिंग रोड, सी-हेक्झॅगॉन (शाहजहान रोड ते टिळक मार्ग), राजपथ रोड (मानसिंग रोडपासून सी-हेक्झॅग़ॉन), अशोक रोड (विंडसर प्लेस ते सी-हेक्झॅग़ॉन), ११ केजी मार्ग (फिरोज शाह रोड ते सी-हेक्झॅग़ॉन), कोपर्निकस मार्ग (मंडी हाऊस ते सी-हेक्झॅग़ॉन), शहाजहान रोड, झाकिर हुसैन मार्ग (एसबीएम ते इंडिया गेट), टिळक मार्ग (सी-हेक्झॅग़ॉन ते टिळक ब्रिज), भगवान दास रोड, सिकंदरा रोड, मथुरा रोड (भैरोन मार्ग टी पॉइंट ते डब्लू पॉइंट), बीएसझेड मार्ग (टिळक ब्रिज ते दिल्ली गेट), आय पी मार्ग, डीडीयू मार्ग, जेएलएन मार्ग (राजघाट ते दिल्ली गेट), रिंग रोड (इंदिरा गांधी स्टेडिअम ते यमुना बाजार), नेताजी सुभाषचंद्र मार्ग (दिल्ली गेट ते छट्टा रेल), निशाद राज मार्ग (नेताजी सुभाषचंद्र मार्ग ते शांतीवन).