सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (11:11 IST)

महायुतीमध्ये जागावाटपावरून रामदास आठवले यांनी केली मागणी

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. अद्याप कोणत्याही जागावाटपाचा फॉर्मुला ठरला नाही. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जागावाटपावरून महायुतीसमोर मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 10  ते 12 जागांवर विधानसभा निवडणुका लढवण्याची आशा व्यक्त केली आहे. ते स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हणाले. सध्या महायुतीच्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागावाटपावरून खडाजंगी सुरु आहे. अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही.

अशी मागणी करून रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीत जागा मागितल्याने महायुती अडचणीत आली आहे. 

रिप्लब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनी या निवडणुकीत स्वबळावर लढवण्यासाठी महायुती कडून 10 -12  जागा देण्याची मागणी केली आहे. 

रामदास आठवले यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ऊसधारी माणूस असे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, उमरेड वाशीम, उमरखेड जागा रिपब्लिकन पार्टी साठी सोडावी असे रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. ते म्हणाले, आम्ही 18  जागांची यादी तयार केली असून किमान 10 ते 12 जागा आम्हाला द्यावी अशी मागणी केली आहे. 
Edited By - Priya Dixit