रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 10 नोव्हेंबर 2024 (10:59 IST)

महाराष्ट्रात महाआघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार शरद पवार म्हणाले-

sharad panwar
Sharad Pawar News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 20 नोवेम्बर रोजी असून मत मोजणी 23 नोवेम्बर रोजी आहे. 
 
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावेळी लढत दोन पक्षांमध्ये नसून दोन महाआघाडींमध्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी करत आहेत. यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे.

शरद पवार यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की एमव्हीए आघाडीमध्ये जो पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल तो मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीत कोणताही निर्णय झाला नसला तरी जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यालाच मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याचा अधिकार असेल. या साठी कोणतेही निश्चित सूत्र नहीं. वेल आल्यावर सांगण्यात येईल असे ते म्हणाले.
 
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. निवडणुकीनंतर एमव्हीएला बहुमत मिळाले तर आघाडीचे प्रमुख नेते बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतील.
Edited By - Priya Dixit