शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (21:11 IST)

नवरात्र विशेष: मत्‍स्‍योदरी देवी मंदिर अंबड मराठी माहिती : अंबडची मत्स्योदरी देवी

फोटो साभार -सोशल मीडिया 
अंबड येथील मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्‍या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्‍या टेकडीवर स्थित आहे त्‍या टेकडीचा आकार मासोळी (मत्‍स्‍य) सारखा आहे. त्‍यामुळे या देवीस मत्‍स्‍योदरी देवीचे मंदिर म्‍हणून ओळखले जाते. हे मंदिर जवळपासच्‍या क्षेत्रातील अत्‍यंत जुन्‍या मंदिरांपैकी एक आहे.ऑक्‍टोबर महिन्‍यामध्‍ये नवरात्र महोत्‍सवाच्‍या निमीत्‍ताने दरवर्षी या मंदिरामध्‍ये मोठी यात्रा भरते
एका आख्यायिकेनुसार, अंबड शहराची स्थापना ऋषी अंबड यांनी केली होती. हे एकेकाळी हिंदूंचे राजा होते. हे आपल्या राजवटीत आपली जबाबदारी सोडून पळून  जाऊन एका गुहेत जाऊन लपून बसले होते.जेणे करून सर्व मोहमायाचा त्याग करता येईल. नवरात्रोत्सवात या मंदिरात मोठी यात्रा भरते.
 
कसे जायचे- 
* बस मार्गे- देशातील इतर शहरापासून जालना जाण्यासाठी नियमित बसेस जातात.बस स्थानक जालना पासून अंबड जाण्यासाठी नियमितपणे बसची व्यवस्था आहे. 
* रेल्वे मार्गे- इतर शहरापासून जालना येण्यासाठी नियमित पणे रेल्वे आहेत.रेल्वे स्थानक जालन्यापासून अंबड जाण्यासाठी नियमितपणे बस ने जाता येते.
* विमानमार्गे- जालनात विमानतळ नाही.परंतु इथे जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबादातील चिक्कलठाणा विमानतळ आहे. जालनापासून अवघे 64 किमी अंतरावर चिक्कलठाणा विमानतळ औरंगाबाद आहे.जालनाला जाण्यासाठी बसेस आहे. आणि जालनापासून अंबड जाण्यासाठी नियमितपणे बसेस  जातात.