महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बिबी का मकबरा येथे पाहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक गड, किल्ले व दुर्ग आहेत. रायगड,...