1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : बुधवार, 12 जानेवारी 2022 (13:49 IST)

मकर संक्रांतीला बनवा ही खास khichdi, खाणारे बोटं चाटतील, जाणून घ्या रेसिपी

सणाचा मोसम आहे आणि आपण काही पदार्थ बनवणार नाही असे तर घडतच नाही. प्रत्येक सणाची स्वतःची रेसिपी असते, असाच एक सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण याला खिचडीचा सण म्हणतात. ही धारणा लोकप्रिय आहे कारण तांदूळ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते, डाळीचा शनी आणि भाज्यांचा संबंध बुधाशी आहे. यामुळे तुमच्या ग्रहांची स्थिती मजबूत राहते. पण त्या खिचडीची स्वादिष्ट रेसिपी सांगितली तर तुमच्या सणाला अजूनच स्वाद येईल-
 
खिचडीसाठी आवश्यक साहित्य
2 कप तांदूळ
2 कप मूग डाळ
1 कप वाटाणे
1 कप कोबी
2 लहान बटाटे, चौकोनी तुकडे
2 लहान टोमॅटो, चिरून
4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या
1 टीस्पून हळद पावडर
चिमूटभर हिंग
2 टीस्पून जिरे
चवीनुसार मीठ
2-3 चमचे तूप
1 टीस्पून गरम मसाला
 
कृती:
1. सर्वप्रथम खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या.
2. आता प्रेशर कुकर मध्यम आचेवर ठेवा आणि तूप गरम करण्यासाठी ठेवा.
3. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. नंतर त्यात हिरवी मिरची, हळद आणि हिंग घालून एक मिनिट शिजवा.
4. यानंतर मटार, बटाटे, कोबी आणि चिरलेला टोमॅटो घाला आणि 4 मिनिटे तळून घ्या.
5. यानंतर डाळ आणि तांदूळ घालून मिक्स करा.
6. नंतर तीन कप पाणी, गरम मसाला आणि मीठ घालून झाकण बंद करा.
7. यानंतर कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
8. कुकरचे प्रेशर संपल्यावर झाकण उघडा आणि सर्व प्रेशर बाहेर करा.
9. अशा प्रकारे तुमची मूग डाळ खिचडी तयार आहे
10. ही खिचडी तुम्ही दही, लोणची, चटणी, पापड किंवा रायतासोबत खाऊ शकता.