1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

Til Wadi तिळाच्या वड्या

Makar Sankranti 2024
तिळाच्या वडया
साहित्य:
अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
अर्धा कप किसून भाजलेले सुके खोबरे
अर्धा कप तिळ
पाऊण कप किसलेला गूळ
अर्धा टेस्पून तूप
अर्धा टिस्पून वेलचीपूड
सुकामेवा
तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत खमंग भाजून घ्यावे. त्यातले अर्धे तीळ मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावे. पोळपाटाला तूप लावून ग्रीस करुन घ्यावे. एका कढईत गूळ घालून बारीक गॅसवर विरघळून घ्यावे.
गुळात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ, दाण्याचे कूट, तूप, दूध, व वेलदोड्याची पूड घालावी. सर्व मिसळून गोळा तयार करावा. तूप लावलेल्या पोळपाटावर वरील मिश्रणाचा गोळा ठेऊन तूप लावलेल्या लाटण्याने अंदाजे अर्धा से. मी. जाड लाटून घ्यावं. वरून खोबरे पसरा व परत एकदा लाटणे फिरवावं. आवडीच्या आकाराचे काप करून घ्यावे.