बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated : शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (16:00 IST)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर लवकरच बायोपिक येणार!

manoj jarange
Manoj Jarange Patil  :मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नाव आज चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत आहे. जालना जिह्यात आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु आहे. जरांगे पाटीलांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे बडे मंत्री देखील भेटले आहेत.  
 
सरकार ने अध्यादेश दिल्याशिवाय हे उपोषण मागे होणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचावर आता बायोपिक येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या वर मनोज यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले आधीच मी प्रश्नाची उत्तरे देऊन दमलो आहो आता त्यात हे चित्रपट येतोय समजलं.

काही लोकांनी माझी भेट घेतली मला वाटले की ते माझ्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आले आहे. त्यांनी म्हटले आम्ही तुमच्यावर चित्रपट करण्याचा विचार करत आहो. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. आता मनोज जरांगे पाटील यांचावर चित्रपट येणार असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटीलांची भूमिका कोण साकारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 



Edited by - Priya Dixit